Tuesday, March 27, 2007

उन जरा जास्त आहे

उन जरा जास्त आहे
दर वर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन
आभाल मनात दाटते

तरी पावले चालत राहतात
मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात
कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावारती चढूंन पाहतो

दूपार टळून संध्याकाळ चा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो
पावासा आधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...

गार वारा हा भरारा

गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास ...

गारवा

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा

पाऊस दाटलेला

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा

गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा

झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा

पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा

पुन्हा पावसालाच सांगायचे

पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे

मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे

घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे

तुझी आसवे पाझरु लागता
खर्‍या पावसाने कुठे जायचे

रिमझिम धून

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून ...

झाडाखाली बसलेले

झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले